Rajasthan Assembly Elections : राजस्थानवासीयांची सत्ताबदल करण्याची परंपरा बदलणार काय?

एकीकडे काँग्रेसने राजस्थानमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

99
Rajasthan Assembly Elections : राजस्थानवासीयांची सत्ताबदल करण्याची परंपरा बदलणार काय?
Rajasthan Assembly Elections : राजस्थानवासीयांची सत्ताबदल करण्याची परंपरा बदलणार काय?
  • वंदना बर्वे

एकीकडे काँग्रेसने राजस्थानमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. तर भारतीय जनता पक्षाने जाहीर सभा घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे राजस्थानवासीयांची सत्ताबदल करण्याची परंपरा बदलणार काय?, असा प्रश्न तर कायम आहेच, पण राजस्थान मधील जनता काय निर्णय घेईल याबद्दल सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल एवढं नक्की. दर पाच वर्षांनी सत्तांतर घडवून आणण्याची राजस्थानवासीयांची परंपरा यावेळी मोडीत निघणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

राजस्थानमधील विधानसभेची निवडणूक जवळपास तोंडावर आली आहे. मागील दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी राजस्थानमध्ये सरकार बदलत आली आहे. परंतु, यावेळेस ही परंपरा मोडित निघणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील सरकारच्या योजनांनी समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श केल्यामुळे राजस्थानचे नागरिक यावेळेस ही परंपरा मोडित काढण्याच्या तयारीत आहे, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेस पक्ष राजस्थानची निवडणूक कर्नाटक मॉडेलवर लढवत आहे. सरकारची पुनरावृत्ती हे कर्नाटक मॉडेल होय. काँग्रेस आणि भाजप सामुहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार असली तरी त्यात थोडा पण महत्वाचा फरक आहे. काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नसली तरी मुख्यमंत्री अशोक गहलोत मुख्य चेहरा राहणार आहे. राजस्थानमध्ये सरकारच्या विरोधात वातावरण नाही. याउलट भाजपमध्ये नेतृत्वावरून भांडणे सुरू आहेत, असा दावा राज्य काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

(हेही वाचा – Supplementary Results 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी-परीक्षेचे निकाल जाहीर; लातूर विभाग प्रथम)

भाजपप्रमाणे काँग्रेसने सुध्दा जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उमेदवारांची निवड तारेवरची कसरत ठरणार आहे. यामुळे काँग्रेस उमेदवार निवडीबाबत सावध आहे. विविध एजन्सींकडून उमेदवारांबाबत सर्वेक्षण करणे आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून फिडबॅक घेतला जात आहे. राजस्थानमध्ये १९९३ पासून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारने रणनीती अंतर्गत सामाजिक मंडळे स्थापन केली आहेत. यासोबतच गुर्जर समाजाचे आराध्य भगवान देवनारायण यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वीज बिलात कपातही केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.