Vinod Tawde : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत असल्याचे या उमेदवाराने सांगितले आहे. यावरून काँग्रेसला संविधानाचा आदर करण्याची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे, असे तावडे म्हणाले.

112
Vinod Tawde : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे. तर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मंगळवारी केली. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात संविधानात ८० वेळा बदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा (BJP) यांच्यावर टीका करण्यासारखे काहीच उरले नसल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे संविधान बदलासाठी भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा हव्या असल्याचा अपप्रचार करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (Vinod Tawde)

मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागला. भाजपाचे संकल्पपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध झाले. यावरून भाजपाचा डॉ. आंबेडकर आणि संविधानाबद्दलचा आदर स्पष्ट झाला असल्याचे तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोवा राज्याला भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी जाहीरपणे केली आहे. राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत असल्याचे या उमेदवाराने सांगितले आहे. यावरून काँग्रेसला संविधानाचा आदर करण्याची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे, असे तावडे (Vinod Tawde) म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील प्रचाराच्या घसरलेल्या पातळीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, शरद पवार हे नेतेही परस्परांवर टीका करत असत. मात्र त्यावेळी प्रचाराची पातळी घसरत नव्हती. (Vinod Tawde)

(हेही वाचा – Maharashtra Lok Sabha Elections : ‘या’ उमेदवाराचा केला सर्वच पक्षांनी प्रचार…)

मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. ‘युपीए’ सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात २५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. करांच्या परताव्यापोटी मिळणाऱ्या रकमेत ३३ टक्के वाढ झाली असून सन २०२०-२०२१ पासून ११ हजार ७११ कोटी एवढे बिनव्याजी कर्ज मिळाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात २७ लाख घरे पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली गेली. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजपा आणि महायुतीला भरभरून मतदान करतील, असा विश्वासही विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Vinod Tawde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.