Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा ‘कोल्ड वॉर’

नाना पटोले यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांच्या तक्रारींचा सपाटा हायकमांडकडे लावल्याने हे शीतयुद्ध सुरू झाल्याचे कळते.

123
Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा 'कोल्ड वॉर'
Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा 'कोल्ड वॉर'

नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात, तसेच नाना पटोले विरुद्ध विदर्भातील काँग्रेस नेते, असा वाद शमतो ना शमतो तोच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा ‘कोल्ड वॉर’ सुरू झाले आहे. नाना पटोले यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांच्या तक्रारींचा सपाटा हायकमांडकडे लावल्याने हे शीतयुद्ध सुरू झाल्याचे कळते. (Maharashtra Congress)

जून २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला, पक्षात वरिष्ठ नेत्यांमध्येच एकोपा नाही, असे चित्र निर्माण झाले. त्यात भर म्हणून नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले विरुद्ध विदर्भातील काँग्रेस नेते, असे वादही चव्हाट्यावर आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे वाद पुन्हा उफाळून येऊ नयेत, यासाठी नेतृत्वबदल केला जावा, असे हायकमांडचे मत आहे. (Maharashtra Congress)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : गाझा पट्टीत सध्या काय घडतंय? सोशल मिडियावर व्हिडियो शेअर करून महिलेने दिली माहिती)

त्यामुळे सतर्क झालेल्या नाना पटोले यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अशोक चव्हाण गट आणि बाळासाहेब थोरात गटाच्या तक्रारी हायकमांडकडे करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अशोक चव्हाण समर्थक विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर या तक्रारींचे प्रमाण अधिक वाढले आहे. ते या पदासाठी कसे योग्य नाहीत, हे पटवून देण्याचा प्रयत्न पटोलेंकडून सुरू आहे. वडेट्टीवार यांनी नुकतेच राहुल गांधींच्या वक्तृत्व शैलीविषयी विधान केल्यानंतर पटोलेंच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. (Maharashtra Congress)

काय म्हणाले वडेट्टीवार?

‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता व्हावे लागेल. कधीही लोकांसमोर बोलतांना उदाहरणासह संवाद साधणे योग्य राहील, असे विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात केले. त्यानंतर नाना पटोले यांनी तात्काळ त्याबाबत हायकमांडला तक्रार केली आहे. (Maharashtra Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.