एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानत मुख्यमंत्री म्हणाले, “…जे शक्य ते सर्व करणार”

156

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा अमृत महोत्सव आज असून आजच्याच दिवशी एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बस शिवाईचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी दर्शवली तर उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब , एसटी महामंडळाचे आयुक्त शेखर चन्ने यांच्यासह इतर मान्यवर देखी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे काही शक्य असेल ते सर्व करू, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

एखादी सेवा जी आपण रोज बघत, तिचा वापर करतो, तेव्हा ती किती वर्षाची झाली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एसटीची ७५ वर्षे अशीच आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आपल्या एसटीची सुरूवात ही १९४८ साली झाली. पहिली एसटी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसा होता. हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. आपली एसटी काळानुरूप किती बदलली हे यातून दिसलं. एसटीची ही वाटचाल पुण्यात सुरू झाली आणि एसटीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पुण्यात झाला, हा एक योगायोग असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – बंद पडलेली वनराणी होणार पर्यावरणप्रेमी!)

कोरोना महामारीदरम्यान, एसटीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी पराक्रम केला. त्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही. गाव तिथे एसटी असं ब्रीद वाक्य असताना कोरोनात एसटीने शहरातही सेवा दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणात, गावात एसटीचे योगदान आहे. एसटीमुळे माझ्या आयुष्याच किती लाभ झाला असं सांगणारी कितीतरी दिग्गज मंडळी आपल्याकडे आहेत. तर परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे पाहतो म्हणूनच एसटी अडचणीत असताना शासनाने मदत केली. असे असले तरी एसटीचा तोटा वाढला. मागील काही महिने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून दिले आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच…अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.