CM Eknath Shinde : तुम्हाला नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते

विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

240
Mahayuti तील शिंदे-सेना का आहे नाराज?

आम्ही दिल्लीला जाऊन राज्याची कामे करवून घेतो. यात आमचा स्वाभिमान कुठेच हरवत नाही. याउलट त्यांना नाक खाजवण्यासाठी देखील मॅडमची परवानगी घ्यावी लागले असा टोला (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्यापासून सातत्याने त्यांच्या दिल्लीवाऱ्या होत आहेत. तसेच अजित पवार यांच्याही दिल्लीवाऱ्या झाल्या आहेत. यावरून विरोधक शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांवर टीका करत असतात. मुख्यमंत्री हे दिल्लीची (भाजपा) कठपुतली असल्याची टीका केली जाते. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचा स्वाभिमान हरवला आहे अशी टीका केली जाते. दिल्लीत जातात, दिल्लीची कठपुतली आहेत, असे म्हंटले जाते. परंतु, ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचे नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. आम्ही दिल्लीला जातो आणि निधी आणतो. केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिले ते मागितल्याशिवाय मिळाले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. कडक सिंग बनून चालत नाही. तुमच्या अहंकारामुळे तुम्हाला केंद्राने पैसे दिले नाहीत. तुम्ही मागितलेसुद्धा नाही. तुमच्या अंहकारामुळे राज्याचे नुकसान झाले. तुम्ही राज्यातले अनेक विकासप्रकल्प बंद पाडले, स्थगित केले. त्यानंतर आमचे सरकार आल्यावर आम्ही ते सुरू केले. तुम्ही राज्याला मागे नेण्याचे काम केले. आम्ही आता राज्याला पुढे नेत असल्याचे शिंदेंनी सांगितले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – POK ला आझाद काश्मीर म्हणणे बंद करा – केरळ राज्यपाल आरिफ मोहम्मद खान)

हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु, विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रात विदर्भाचा एकही मुद्दा नाही. तसेच या पत्रावर 23 नेत्यांची नावे आहेत. मात्र, त्यावर केवळ सातच आमदारांनी सह्या केल्या आहेत. बाकीचे नेते पत्रकार परिषदेत झोपले होते, त्याचप्रमाणे सह्या करायच्या वेळेसही झोपले असतील असा टोला देखील शिंदेंनी लगावला. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.