आता लिखापडी बंद, थेट कार्यवाही! मुख्यमंत्री म्हणाले सिस्टीम बदलणार 

108

आम्ही ४० जण ८० हजार मते घेऊन आलो आहोत, सगळे दबंग आहेत. आम्ही रक्तपात घडू देणार नाही, पण सहनशक्तीची मर्यादा असते, मी मुख्यमंत्री झालो तरी त्याचा फायदा घेणार नाही, मी मुख्यमंत्री झालो हेच मला माहित नाही, मी इथे माझ्या सहकाऱ्यांना सांगतो ‘तुम्ही ५० आमदारही मुख्यमंत्री आहेत. मला भाजपाचे ११६ जणही मुख्यमंत्री वाटतात, सगळेच मुख्यमंत्री झाल्याचे वाटतात. हे आमदार जेव्हा माझ्याकडे पत्र घेऊन येतात आणि इथे सही करा सांगतात, मी त्यांना सांगतो ‘आता पत्र वगैरे नाही, थेट जिल्हाधिकाऱ्या फोन करून ‘ये काम करो’, असे सांगतो. लिखापडी बंद, याला टाइम लागतो, ‘तपासून सादर करा’, याच्यात खूप वेळ जातो. आता थेट कार्यवाही करा. तरच आम्ही दोनशे होणार. त्यामुळे सिस्टीम आम्हाला बदलायला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आमचे सरकार सूड बुद्धीने चालणार नाही 

माझे आणि फडणवीसांचे ट्युनिंग चांगले आहे. परवा पत्रकार परिषद घेतली तेव्हा आमच्या लोकांचे जीव टांगणीला लागले होते, एक नंबर एक नंबर करत होते, पत्रकार परिषदेत फडणवीसांना सगळे माहित होते, त्यांनी एकाचाच शपथविधी होईल असे सांगितले होते. आम्ही एकाच विचारासाठी एकत्र आलो आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आपण सगळे शिवसैनिक आहोत, ५० पैकी एकही आमदार मी पडू देणार नाही. मी आणि फडणवीस दोघे मिळून २०० करणार आहोत. हा या सभागृहातील शब्द आहे. नाहीतर गावाला जाऊन शेती करेन. माझा एक नातू आहे, फुल टाइम पास आहे. माझे दोघे गेले आता एकच आहे. म्हणून घरी लवकर जायला लागलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी मनातील हळव्या कोपऱ्यातील आठवण मोकळी केली. कितीही झाले तरी आमचे १७० आहेत, उद्या आणखी वाढत जातील, तरीही आमचे सरकार सूड बुद्धीने चालणार नाही, सरसकट आम्ही आधीच्या सरकारचे निर्णय बदलणार नाही, जेथे चुकीचे निर्णय असतील ते बदलू, आम्हाला कुठेही ‘ग’ची लागण होणार नाही, आता तुम्ही हे स्वीकारले पाहिजे. शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्व असते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा सत्तेत असताना शिवसैनिकाला तडीपाऱ्या, वाँटेड शिवाय काही मिळाले नाही! मुख्यमंत्र्यांनी मांडली व्यथा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.