CM Eknath Shinde : सत्ता गेल्यामुळे विरोधकांना वेड लागलेय; उद्धव गटाच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

87
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार
CM Eknath Shinde : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार

शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांचे आजारपण हे खरं आजारपण नसून केवळ मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी व्यथित होऊन आलेलं आजारपण असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचे आजारपण हे अजित पवारांच्या सत्तेत आल्याने झालेलं दु:खणं असल्याचं शिवसेना उबाठा गटाने म्हटलं आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना CM Eknath Shinde प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, टीकाकरांना सत्ता गेल्यामुळे वेड लागलंय, त्यांना काहीही सूचत नाही, म्हणून ते अशी विधानं करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

सत्ता गेल्यामुळे ज्यांना काही सूचत नाही ते अशी विधान करत आहेत. सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार…असं ते म्हणतात. पण, सरकार पडता पडता म्हणणारे पाहतायंत, हे सरकार मजबूत होत चाललंय. सत्ता गेल्यामुळे ज्यांना वेड लागलंय त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी CM Eknath Shinde म्हटलं. पुण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटासह विरोधी काँग्रेस नेत्यांकडूनही अशाच चर्चा होत आहे. या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणासंदर्भातील टीकेवर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी कडक शब्दात भूमिका मांडली. ते बिलकुल खोटं आहे, आम्ही त्यांच्या भेटीला गेलो असता त्यांचा ताप १०३ पर्यंत गेला होता. सातत्याने काम करत असल्याने धावपळ आणि दगदगीतून हे आजारपण आलं असावं. नेतृत्त्व बदलासाठी आजारपण घेण्याची गरज नाही, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Devendra Fadnavis : राज्याची अर्थव्यवस्था जनतेला न्याय देणारी असेल; अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.