शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे भोसलेंना दिली महत्त्वाची जबाबदारी

167
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे भोसलेंना दिली महत्त्वाची जबाबदारी
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे भोसलेंना दिली महत्त्वाची जबाबदारी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५०वे वर्ष आहे. हा ३५०वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर दिमाखात साजरा केला जात आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे एक मोठी जबाबदारी दिली आहे. प्रतापगड प्राधिकरणांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत उदयनराजे यांच्याकडे या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून शिवराज्याभिषेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा; म्हणाले…)

रायगडावर साजरा होत असलेल्या राज्याभिषेक सोहळ्यात शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शिवरायांच्या पराक्रमामुळे अखंड भारताला सुखाचे क्षण अनुभवता आले. आपल्या माता भगिनींच जगणं सुसह्य झालं. साधुसंत, धर्म, देवळाचं रक्षण झालं. म्हणूनच आजचा हा सोहळा पाहतोय. हा सोहळा म्हणजे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पूजा आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आमच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, रयतेच्या हक्काचं रक्षण करणारं आहे अशा प्रकारची सुरुवात आम्ही केली होती. आज आपण पाहताय, ११ महिने सरकार काम करतंय आणि प्रत्येक निर्णय आपल्या साक्षीने घेतय. हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आहेत, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहेत आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते, म्हणूनच आम्ही त्या गडकोट किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय. एक दुर्ग प्राधिकरण देखील आपलं सरकार करतंय. उदयनराजेंची जी मागणी आहे की, प्रतापगड प्राधिकरण करावं. ते आज मी या ठिकाणी जाहीर करतो की या प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले असतील.’

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघनख महाराष्ट्रात परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी मदत करतील आणि त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.