Devendra Fadnavis : कथा, कादंबरी आणि बाल वाड्ःमय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाआधीच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
(हेही वाचा Vasai-Virar मध्ये ईडीचे छापे: अधिकाऱ्याच्या घरातून ८ कोटी रोकड आणि २३.२५ कोटींचे दागिने जप्त )
ते म्हणाले, त्यांचं सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का, असे म्हणत पुस्तक प्रकाशनापूर्वीच भाष्य करत संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढविणार आहोत, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केला.
उबाठा गट नेते संजय राऊत यांचं ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांचं पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’मध्ये अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात संजय राऊतांच्या पुस्तकाने एकच खळबळ माजली आहे. त्यावर आता विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असून आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडलेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिली.Devendra Fadnavis
Join Our WhatsApp Community