“काही अपवादात्मक ठिकाणी महायुती…”: महापालिका निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं मोठं विधान

Devendra Fadnavis : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार असून याबाबत आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार की नाही यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, आम्हाला या निवडणूका महायूती म्हणूनच लढायच्या आहेत.

66

(हेही वाचा राज्यात लोकशाहीचा उत्सव पुन्हा रंगणार! Local Body Election च्या तयारीला लागण्याचे प्रशासनाला आदेश )

ते पुढे म्हणाले, महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित असून आमची महायुती आहे. महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने काही अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढावे लागले तरी आमच्या मित्रपक्षांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. पण जास्तीत जास्त ठिकाणी महायुती एकत्रित लढण्याच्या दृष्टीने प्रयत्न आम्ही करणार आहोत,” असे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणूका वेळेत घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची तयारी सुरु केली असून वेळेत या निवडणूक घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याकरिता निवडणूक आयोग आणि आम्ही गरज पडल्यास वेळ मागू. पण या निवडणूका वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.Devendra Fadnavis

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.