#ClickHere हा प्रकार नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

"आम्ही सर्वांना सशक्त करण्यासाठी आणि ट्विटरवर शेअर केलेला कंटेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून ही सुविधा सुरु करत आहोत," असं कंपनीने सांगितले आहे.

173
#ClickHere हा प्रकार नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

शनिवार (३० मार्च) संध्याकाळपासून, एक्स एक ९ट्विटर) #ClickHere प्रचंड वायरल होत आहे. सर्व राजकीय नेत्यांनी देखील या ट्रेंडमध्ये भाग घेतला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यंदा राज्यभरातून किती मतदार घरबसल्या मतदान करणार, जाणून घ्या आकडा)

नक्की काय आहे हा ट्रेंड ?

डाव्या बाजूला खालच्या दिशेने जाणारा हा बाण ‘अल्ट टेक्सट’ (#ClickHere) किंवा अल्टरनेटीव्ह टेक्स्ट सेक्शन अधोरेखित करतो. सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना त्याच्यासोबत काही महिती द्यायची असल्याच या फिचरचा फायदा होतो. दृष्टीदोष असलेल्या किंवा दृष्टीसंदर्भातील समस्या असलेल्यांना या माध्यमातून टेक्स टू स्पीच पद्धतीने मजकूर ओळखण्यास मदत होते. तसेच याचा संदर्भ ब्रेल भाषेशीही जोडण्यात आला आहे. फोटो डिस्क्रीप्शनमध्ये (#ClickHere) अल्ट टेक्स फिचरच्या माध्यमातून 420 कॅरेक्टरचा मजकूर पोस्ट करता येणार आहे. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास त्या बाणाच्या टोकाजवळ असलेल्या ALT या पर्यायावर क्लिक केल्यास इमेजबरोबरचा मेसेज युझर्सला वाचता येतो. (#ClickHere)

(हेही वाचा – Braille Voter Information Slip : अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली माहिती)

८ वर्षांपूर्वीचा ट्रेंड होतोय पुन्हा वायरल :

२०१६ मध्ये हे फिचर लॉन्च (#ClickHere) करण्यात आले होते. “आम्ही सर्वांना सशक्त करण्यासाठी आणि ट्विटरवर शेअर केलेला कंटेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून ही सुविधा सुरु करत आहोत,” असं कंपनीने ८ वर्षांपूर्वी ही सुविधा लॉन्च करताना म्हटलं होतं. (#ClickHere)

(हेही वाचा – Sanjeev Balyan : भाजपा उमेदवार संजीव बल्यान यांच्या ताफ्यावर हल्ला; वाहनांची तोडफोड)

राजकीय पक्षाची ट्रेंडमध्ये उडी :

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘Click here अशी पोस्ट शेअर करत भाजपानेही या व्हायरल ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीने (आप) रविवारी, 31 मार्च रोजी होणाऱ्या आपल्या भव्य रॅलीबद्दल आपल्या ‘येथे क्लिक करा’ या पोस्टमध्ये एक संदेश दिला होता. तसेच “देश वाचवण्यासाठी 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर या”, असे पक्षाने पोस्टच्या तत्कालीन alt टेक्स्ट विभागात लिहिले होते. (#ClickHere)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.