नवी मुंबईत (CIDCO Lottery 2025) विमानतळ आणि वेगाने रस्तेमार्गाचे जाळे विणले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना नवी मुंबईत घर खरेदी करणं आवाक्या बाहेरचं वाटत आहे. नवी मुंबईत सध्याच जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच, सिडकोकडून (CIDCO Lottery 2025) लवकरच नव्या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून नवी मुंबईतील तब्बल 22 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. (CIDCO Lottery 2025)
हेही वाचा-School Timing : राज्यात शाळांच्या वेळेत मोठा बदल! आता सकाळी ७ ऐवजी ९ वाजता …
जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे मागील गृहयोजनेतील शिल्लक राहिलेल्या 16 हजार घरांचासुद्धा यात समावेश केला जाणार आहे. सिडकोने (CIDCO Lottery 2025) अलीकडेच काढलेल्या 26 हजार घरांच्या विक्री योजनेला विविध कारणांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. असे असले तरी सोडतीत यशस्वी ठरलेल्या जवळपास दहा हजार ग्राहकांनी घराचा पहिला हप्ता भरला आहे. हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. (CIDCO Lottery 2025)
हेही वाचा- Accident News : जयपूरमध्ये ट्रक आणि जीप यांच्यात भीषण अपघात ! वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू
लवकरच सिडकोच्या (CIDCO Lottery 2025) घरांची सोडत प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून घरांच्या लॉटरीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु होईल, असा अंदाज आहे. लॉटरीत जवळपास 22 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय आहे. सिडकोच्या संचालक मंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत सोडत प्रक्रिया कधी सुरु होणार, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या नव्या सोडतीमधील 22 हजार घरांमध्ये वाशीसह, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणागिरी येथील घरांचा समावेश आहे. (CIDCO Lottery 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community