मंगळवार, २० मे २०२५ या दिवशी रात्री उशिरा कुशीनगरमधील दुधी येथील शाहपूर खलवा पट्टी गावात धर्मांतराची (Conversion) बातमी मिळताच पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. पोलिस येताच गोंधळ उडाला आणि पाद्री अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा व्हिडिओ बनवला आणि घरमालकाची चौकशी केली. या प्रकरणात एका हिंदू नेत्याच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गावातील सीताराम आणि संतोष या दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, २० मे २०२५ च्या मध्यरात्री शाहपूर खलवा पट्टी गावातील एका घरात ५० हून अधिक महिला आणि पुरुष प्रार्थना सभेला उपस्थित होते. याची माहिती मिळताच हिंदू नेते तिथे पोहोचले, त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि तो पोलिसांना पाठवला. यानंतर, राष्ट्रीय बजरंग दलाचे ब्लॉक डिफेन्स प्रमुख बबलू कुमार यांच्या तक्रारीवरून, अज्ञात लोकांविरुद्ध धर्मांतराचा (Conversion) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी (२१ मे २०२५) अटक केलेल्या सीताराम आणि संतोष यांचे चालान सादर केले आहे.
Join Our WhatsApp Community