Devendra Fadnavis : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी २२ एप्रिलला दहशदवादी हल्ला झाला. यावेळी निष्पाप २६ जणांना बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे भारतातील वातावरण तनावग्रस्त झाले आहे. अशातच कॉंग्रेसच्या एक बड्या नेत्यांनी घटनेवर गरळ ओकली आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Devendra Fadnavis Vijay Wadettiwar controversy) यांनी सरकारवर टीका केली. ‘दहशतवादी हल्ला करतावेळी लोकांशी बोलत बसतील का? धर्म विचारत बसतील का? सरकार लोकांना भरकटवतंय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.यावर पलटवार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ)
कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या त्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. म्हणाले की, “अशा प्रकारची वक्तवे करुन जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चाललं आहे. नातेवाईकांचे म्हणणं सगळ्यांनी दाखवलं. ज्यांच्या समोर मारले त्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करुन नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाहीये,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“वडेट्टीवारांचे विधान हे असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करु शकणार नाही. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – Ravi Shastri on Bumrah : इंग्लंड दौऱ्यात बुमराहला कसं वापरायचं यावर रवी शास्त्रींचा भारतीय संघाला सल्ला)
विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?
पहलगाम हल्ल्यावर सरकारमधील कुणीच काहीही बोलायला तयार नाही. हे लोक (सत्ताधारी) काय बोलतात, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारलं. मुळात दहशतवाद्यांना यासाठी वेळ होता का? पर्यटकांच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्यांना धर्म विचारायला वेळ होता का? काही लोक म्हणतात धर्म विचारले, तर काही म्हणतात असं काहीच घडलेलं नाही, मुळात दहशतवाद्यांचा धर्म किंवा कुठलीही जात नसते’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community