Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींना न्यायमूर्ती पदाची शपथ

केंद्र सरकारने कॉलेजियमच्या शिफारशीला ४८ तासांत मान्यता दिली. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले.

184
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींना न्यायमूर्ती पदाची शपथ

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दोन नवीन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश पदाची शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि अधिवक्ता के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश आहे. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा ३४ न्यायाधीशांचा कोरम पूर्ण झाला आहे.

(हेही वाचाDefense : संरक्षण उत्पादनाने प्रथमच ओलांडला 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा)

ऑगस्ट २०३० मध्ये, के. व्ही विश्वनाथन भारताचे (Supreme Court) सरन्यायाधीश (CJI) होतील. विश्वनाथन २४ मे २०३१ पर्यंत म्हणजेच ९ महिन्यांहून अधिक काळ देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करतील.

१६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वरिष्ठ वकील के.व्ही विश्वनाथन आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी केंद्राकडे शिफारस केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांनी ही शिफारस केंद्राकडे पाठवली होती. ते म्हणाले होते- ‘सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीश असायला हवेत, पण आता फक्त ३२ न्यायाधीश आहेत. काही न्यायाधीशांच्या (Supreme Court) निवृत्तीनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २८ न्यायाधीश उरणार आहेत. या कारणास्तव आधी या दोन न्यायाधीशांची नियुक्ती करावी.

हेही पहा –

केंद्र सरकारने कॉलेजियमच्या शिफारशीला ४८ तासांत मान्यता दिली. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Supreme Court)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.