Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड मध्ये चुरशीची लढत

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आपापल्या जागेवर पिछाडीवर आहेत.

467
Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड मध्ये चुरशीची लढत
Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड मध्ये चुरशीची लढत

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी (3 डिसेंबर) सुरू आहे. राज्यात 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात मतदान पार पडले. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. (Chhattisgarh Assembly Election 2023)

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आपापल्या जागेवर पिछाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेऱ्यांमधील मतमोजणीचा कल पाहता सध्या काॅंग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.(Chhattisgarh Assembly Election 2023)

(हेही वाचा : Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान मध्ये भाजप वरचढ ,काँग्रेसचीही घौडदौड सुरु)

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 90 जागा आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता असते. यावेळी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 20 नक्षलग्रस्त जागांवर 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2018 मध्ये झाल्या होत्या आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.