VHP : विहिंपची महाराष्ट्र व गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा

137
२०१४ हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्ट्यब्दीपूर्ती वर्ष आहे. यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विश्व हिंदू परिषदेने (VHP) आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त विश्व हिंदु परिषदेची युवा संघटना असलेल्या बजरंगदलातर्फे संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोवींद शेंडे यांनी दिली.
शेंडे यांनी सांगितले की, मुंबई क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ही यात्रा ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विविध स्थानांवर काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. शिवछत्रपती हे हिंदूंचे परमोच्च आदर्श आहेत. तत्कालीन सर्व परकीय धर्मांध, लुटारू, जिहादी शक्तींना शिवरायांनी पराभूत करून हिंदूंचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले व याचाच आदर्श समोर ठेवून शिवरायांना मानवंदना व शिवराज्याभिषेकाचा कालावधी या दुग्धशर्करा योगावर छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा काढण्यात येणार आहे.

छत्रपतींच्या शौर्याचे हिंदू समाजात पुनर्जागरण व्हावे या उद्देशाने ही जागरण यात्रा महाराष्ट्र व गोवा या राज्यांमधून प्रवास करणार आहे. युवा संत, खेळाडू, हिंदू युवक, शिवकालात असणाऱ्या सरदार घराण्यांचे वंशज, हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय असे सर्व या यात्रेते सहभागी होणार आहेत. वैभव संपन्न, उद्यमी, शौर्ययुक्त, समरस विजयी हिंदू समाज निर्माण व्हावा हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (VHP)  कार्याचा विस्तार व्हावा व बजरंग दलाच्या कार्याशी हिंदू युवकांना जोडावे यासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ही यात्रा जवळपास १० हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. प्रत्येक शासकीय जिल्ह्यातून एक यात्रा व तिच यात्रा प्रत्येक नियोजित तालुका व गावांमध्ये जाणार आहे. सर्व मोठ्या शहरांमध्ये यात्रा व भव्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.