
वरवर शांतपणे पार पडणाऱ्या एका शपथविधीमागे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंगावतंय. मंगळवारी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राजभवनात अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली, तरी त्यापूर्वीच या निर्णयावर प्रखर टीकेचा धडाका बसला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून सवाल केला आहे. “वाह फडणवीस वाह! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार?” त्यांच्या या एक्सवरील पोस्टमध्ये नाराजी दिसत आहे. दमानिया पुढे म्हणतात, “हा संदेश आहे का आमच्यासारख्या भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्यांना की तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही?” त्यांनी भुजबळांच्या तुरुंगातील काळात प्रसारित झालेल्या “बिचाऱ्या” छायाचित्राचा संदर्भ देत, आता ते पुन्हा मंत्रिपदावर आल्यावर “ठणठणीत” असल्याचा टोला लगावला आहे.
(हेही वाचा – मुंबईकर घाबरू नका! ते दोन मृत्यू कोविडमुळे नाही; KEM Hospital ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…)
तर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार (Ajit Pawar) जातिवादी लोक पोसण्याचं काम करत आहेत, भुजबळांना मंत्रिपद देणं ही मोठी चूक आहे,” असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही टीकांमुळे भुजबळांच्या पुनरागमनावर राजकीय वादंग उभं राहिलं आहे.
भुजबळांच्या मंत्रिपदावरून वातावरण तापलं असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी काय घडतं, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community