राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं संजय राऊतांना वाटतं का? छगन भुजबळांचा सवाल

139
राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं संजय राऊतांना वाटतं का? छगन भुजबळांचा सवाल
राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं संजय राऊतांना वाटतं का? छगन भुजबळांचा सवाल

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून करण्यात आला आहे. सध्या यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी संजय राऊतांना यावरून सवाल केला आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असं संजय राऊतांना वाटतं का?, असं छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना विचारले.

नक्की छगन भुजबळ काय म्हणाले?

‘मला असं वाटतंय की, दोन दिवसांपूर्वी पवार साहेबांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामध्ये जो काही उल्लेख केला असेल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होत की, उद्धव ठाकरेंनी दोन वेळा मंत्रालयात येणं पचनी पडलं नाही. याचा अर्थ त्यांनी त्यांचं मत मांडलं. पण त्याच्यावर अतिशय सुतज्ञपणे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही. त्याच्यामुळे मी या प्रश्नोत्तरामध्ये भाग घेऊ इच्छित नाही. याचा अर्थ मला कलगीतुरा लावायचा नाही. हा सगळाकाही संपादकीय आहे, ते संजय राऊतच लिहितात. आता उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर त्यांना हे सगळं उकरून काढण्याची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं? किंवा असे मतभेद निर्माण व्हावे?’ असे सवाल भुजबळांनी उपस्थित केले.

तसेच भुजबळ पुढे म्हणाले की, ‘पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, तुमचं जेवढं आयुष्य असेल, तेवढं त्यांच राजकारण आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठे काय करायचं याची चांगली कल्पना आहे. असं काही समजायचं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, जयंतराव असतील असे अनेकजण काम करायला समर्थ आहेत. आणि जी त्यांच्यावर जबाबदारी टाकली जाईल, ते समर्थनपणे पेलणारे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यामुळे इतरांनी त्याची काळजी करण्याचे कारण नाही.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.