Chhagan Bhujbal पुन्हा मंत्रिमंडळात! आज कॅबिनेट मंत्री शपथ; अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार

Chhagan Bhujbal पुन्हा मंत्रिमंडळात! आज कॅबिनेट मंत्री शपथ; अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार

61
Chhagan Bhujbal पुन्हा मंत्रिमंडळात! आज कॅबिनेट मंत्री शपथ; अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार
Chhagan Bhujbal पुन्हा मंत्रिमंडळात! आज कॅबिनेट मंत्री शपथ; अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार

राजकारणात नेहमीच सक्रिय आणि अनुभवसंपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात प्रवेश करणार आहेत. आज, २० मे रोजी सकाळी १० वाजता ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. (Chhagan Bhujbal)

हेही वाचा-Shankhnad Mahotsav 2025 : भारताच्या विजयासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात शतचंडी यज्ञ !

भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येणार असून, सध्या हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे होते. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते.सरकारमधील अंतर्गत बदलांमुळे हे खाते भुजबळांकडे सोपवण्यात येणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा उपयोग या खात्याच्या कामकाजासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Chhagan Bhujbal)

हेही वाचा- ISI एजंटने भारतातील हेरांना कोणतं काम दिले होतं?, दोघांतील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती, वाचा संपूर्ण बातमी

शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश होत असल्यामुळे, राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावी नेते असून, त्यांच्या मंत्रिमंडळात पुनःप्रवेशामुळे ओबीसी समाजात सरकारबद्दल सकारात्मक संदेश जाईल, असा राजकीय अंदाजही व्यक्त होतो आहे. (Chhagan Bhujbal)

हेही वाचा- Pakistan’s helpers : ज्योती मल्होत्रापासून हरकिरत सिंगपर्यंत १० हेर अटकेत; कुणावर काय-काय आरोप, जाणून घ्या

भुजबळ यांच्या शपथविधीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या समर्थकांमध्येही आनंदाची लाट पसरली आहे. काही काळ मंत्रीपदाबाहेर राहिल्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा सक्रिय भूमिकेत येणार आहेत. (Chhagan Bhujbal)

हेही वाचा- Operation Sindoor : ​​राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहेत का? भाजपाचा हल्लाबोल

उद्या सकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या घडामोडींमुळे राज्यातील सत्तासंयोजनात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Chhagan Bhujbal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.