Maratha Reservation : कोणीही नाराज होणार नाही असा आहे राज्य सरकारचा निर्णय – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत. तीच भूमिका कायम आहे

129
Maratha Reservation : कोणीही नाराज होणार नाही असा आहे राज्य सरकारचा निर्णय - चंद्रशेखर बावनकुळे

विरोधी पक्षाचे लोक संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी यापैकी कोणीही नाराज होणार नाही. राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे याबाबत भूमिका स्पष्ट आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Maratha Reservation)

नुकत्याच झालेल्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का हे तपासून घेऊ. शिवाय यावर आक्षेप सुद्धा मागवले आहे. त्याची सुनावणी होईल आणि त्यानंतर अधिसूचना मान्य होईल. कुणबी असूनही प्रमाणपत्र न मिळणे यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. जे मुळात कुणबी समाजात होते, त्या लोकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळेल अशी माहितीही त्यांनी दिली. ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ओबीसीत कोणालाही वाटेकरी घेतले गेले नाही. पुढे काय भूमिका येईल ते बघू. आज तरी ओबीसी समाजात अन्याय झाल्याची चिंता करण्याची गरज नाही. सदावर्ते यांच्यासोबत भाजपचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही. एखाद्या वेळी भूमिका विरुद्ध गेल्यावर भाजपला बदनाम करण्याचे काम होत असते, असे देखील बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा :Pune Metro : पुणे मेट्रोच्या खर्चाचा वाढता आकडा ; केंद्र शासनाकडे पाठवला प्रस्ताव)

राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत. तीच भूमिका कायम आहे, असेही बावनकुळे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदी आढळून आल्या आहे. त्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना ज्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.