Chandrashekhar Bawankule : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ठाकरेंना चालणार का – चंद्रशेखर बावनकुळे

खरगे हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खरगे चालतील काय, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे, असा प्रश्न Chandrashekhar Bawankule यांनी केला आहे.

117
Chandrashekhar Bawankule : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ठाकरेंना चालणार का - चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ठाकरेंना चालणार का - चंद्रशेखर बावनकुळे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे खासदार प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांचे वडिल मल्लिकार्जून खरगे हे इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उध्दव ठाकरे यांना चालतील का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवार, २० डिसेंबर रोजी केला. हिंगोली येथे भाजपाच्या सुपर वॉरीयर्सच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

(हेही वाचा – Hasan Mushrif : रुग्णालय प्रशासनात सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश; हसन मुश्रीफ यांचे सूतोवाच)

खरगे हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार

त्या वेळी त्यांनी ‘इंडि’ आघाडीवरही (INDIA alliance) निशाणा साधला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांचा मुलगा खासदार प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांचा अपमान केला. आता खरगे हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान करणारे खरगे चालतील काय, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – PM Modi On America Allegations : पुरावे असतील तर बोला…; पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला खडसावले)

भाजपचे सुपर वॉरियर्स

राज्यात लोकसभा निवडणुसाठी भाजपाने सुपर वॉरियर्सच्या (Super Warriors) नियुक्त्या केल्या आहेत. या वॉरियर्सच्या माध्यमातून 3.50 लाख कुटुंबांना भेट दिली जाणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या किंवा नाही, याची माहिती घेतली जाणार आहे. ज्या योजना पोहोचल्या नाहीत, त्यासाठी काय करावे लागेल, याचे सर्वेक्षण केले जाणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महायुतीचे 45 पेक्षा जास्त खासदार विजयी होणार

ते पुढे म्हणाले की, जनतेकडून प्राप्त झालेले निवेदन सरकारकडे मांडले जाणार आहे. राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समन्वयातून महायुतीचे 45 पेक्षा जास्त खासदार विजयी होतील, असा दावा बावनकुळे यांनी या वेळी केला. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.