Chandrashekhar Bawankule यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले…

37
महसूल अधिकाऱ्यांना Chandrashekhar Bawankule यांचा दम; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबन
  • प्रतिनिधी

काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि निवडणूक आयोगाची बदनामी करत असल्याचा घणाघाती आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. “महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने काँग्रेस सैरभैर झाली आहे. काँग्रेसने आपले मूळ विचार सोडले असून, त्यांचे राजकारण चापलुसीचे, तर भाजपाचे राजकारण विकासाचे आहे,” असे बावनकुळे म्हणाले. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी शेकडो समर्थकांसह मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश केला. या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.

(हेही वाचा – घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा BMC करणार स्वतंत्र जमा; त्यासाठी करावी लागणार नोंदणी)

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल, योगेश टिळेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, राजेश पांडे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. बावनकुळे यांनी थोपटे यांचे ‘कोहीनूर हिरा’ असे वर्णन करत स्वागत केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्पनेला साथ देण्यासाठी थोपटे यांनी प्रवेश केला. त्यांचा जनसंपर्क आणि अनुभवामुळे पुणे जिल्ह्यात भाजपाला बळ मिळेल,” असे ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – Jammu-Srinagar Highway अजूनही बंदच; पर्यटकांचीही गैरसोय)

रवींद्र चव्हाण यांनी थोपटे यांच्या प्रवेशाने पक्षसंघटनेला ताकद मिळेल, असे सांगत पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. थोपटे यांनी काँग्रेसने आपल्याला पक्ष सोडण्यास भाग पाडले, असे नमूद करत, “विकासकामांना गती देण्यासाठी मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपाच सक्षम आहे. कोणत्याही पदासाठी नव्हे, तर जनहितासाठी दुप्पट ताकदीने काम करेन,” अशी ग्वाही दिली. थोपटे यांच्यासह भोर, राजगड, मुळशीचे काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, नाना राऊत, गंगाराम मानेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे, महिला काँग्रेस अध्यक्ष गितांजली शेटे, किरण काळभोर, राजगड सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव सुके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव आंबवले, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक शिवाजीराव बुचडे, निर्मलाताई आवारे, शोभाताई जाधव, स्वरुपाताई थोपटे यांनीही भाजपात प्रवेश केला. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.