छत्तीसगड राज्यातील २ हजार १६१ कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाने (ED, ईडीने) माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांचे रायपूर येथील घर, सुकमा येथील काँग्रेस भवन (Congress Bhawan) आणि त्यांचा मुलगा हरीश कवासी यांचे सुकमा येथील घर जप्त केले. (Chhattisgarh Liquor Scam Case)
हा घोटाळा वर्ष २०१९ ते २०२२ या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात झाला होता. कवासी लखमा आणि त्यांचा मुलगा हरीश या प्रकरणात कारागृहात आहेत. दारू घोटाळ्याशी संबंधित अवैध व्यवहारांच्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले.
(हेही वाचा – ST Monthly Pass : एसटी पास आता शाळेतच मिळणार; विद्यार्थ्यांची रांगांतून सुटका)
दुसरीकडे काँग्रेसचे माध्यम प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी ईडीच्या या कारवाईला ‘राजकीय सूडबुद्धी’ असे संबोधले आहे.
छत्तीसगडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी एसीबी/ईओडब्ल्यू छत्तीसगडने आयपीसी, १८६० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला, असे निवेदनात म्हटले आहे.
ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, छत्तीसगडचे तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांना दारू घोटाळ्यातून दरमहा २ कोटी रुपये मिळत होते. त्यांनी ३६ महिन्यांत ७२ कोटी रुपये अपराधाची रक्कम (POC) म्हणून मिळवले.
अधिकृत निवेदनानुसार, तपासातून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले, ज्यातून कवासी लखमा यांनी नमूद केलेल्या मालमत्तांच्या बांधकामात रोख रकमेचा वापर केल्याचे दिसून आले.
सुकमा येथील काँग्रेस भवनच्या बांधकामात ६८ लाख रुपये वापरले गेले, हरीश लखमा यांच्या घराच्या बांधकामात १.४० कोटी रुपये वापरले गेले आणि रायपूर येथील त्यांच्या स्वतःच्या घराच्या बांधकामात २.२४ कोटी रुपये वापरले गेले. कवासी लखमा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की, २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या दारू घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाले आणि प्राथमिक गुन्हे करून २१६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त POC (अपराधाची रक्कम) तयार झाली, असे निवेदनात म्हटले आहे. (Chhattisgarh Liquor Scam Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community