Lok Sabha MPs Suspension : लोकसभेतील निलंबित खासदारांचे शतक; तीन खासदार निलंबित

लोकसभेने वारंवार ताकीद दिल्यांनतर तिन्ही खासदार वेलमध्ये हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत होते. त्यांना अनेकदा जागेवर जाऊन बसण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे तिन्ही खासदारांना निलंबित करण्यात आले.

141
Lok Sabha MPs Suspension : लोकसभेतील निलंबित खासदारांचे शतक; तीन खासदार निलंबित
Lok Sabha MPs Suspension : लोकसभेतील निलंबित खासदारांचे शतक; तीन खासदार निलंबित
  • वंदना बर्वे

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी (२१ डिसेंबर) आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. निलंबित खासदारांचा आकडा आता १०० वर पोहचला आहे. यामुळे, लोकसभेने शंभर खासदारांना निलंबित करून शतक मारले अशी चर्चा रंगली आहे. (MPs Suspended)

निलंबनात ‘या’ खासदारांचा समावेश 

संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आणखी तीन खासदारांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. यांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे चिरंजीव आणि छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांचा समावेश आहे. याशिवाय, डी के सुरेश आणि दीपक बैज यांनाही निलंबित करण्यात आले. (MPs Suspended)

लोकसभेने वारंवार ताकीद दिल्यांनतर तिन्ही खासदार वेलमध्ये हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत होते. त्यांना अनेकदा जागेवर जाऊन बसण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे तिन्ही खासदारांना निलंबित करण्यात आले. लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या आता १०० वर पोहचली आहे. (MPs Suspended)

(हेही वाचा – Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने पुन्हा हादरले ठाण्यातील कासारवडवली)

निलंबित खासदारांची संख्या आता १४६ वर

दरम्यान, लोकसभेचे अध्यक्षओम बिर्ला यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, ‘सभागृहात घोषणाबाजी करणारे खासदार माझ्याजवळ येतात आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी करतात’. ही गोष्ट चांगली आहे काय? असा उलटप्रश्न सुध्दा त्यांनी केला. जनतेने आपल्याला त्यांची कामे करण्यासाठी निवडून पाठविले आहे. परंतु त्यांच्या समस्यांना वाचा फोडायचे सोडून सभागृहात घोषणाबाजी करतात. ही बाब चांगली आहे काय? असेही ते म्हणाले. (MPs Suspended)

महत्वाचे म्हणजे, लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या आता १०० वर पोहचली आहे. काल बुधवारी दोन खासदारांचे निलंबन झाल्यानंतर निलंबित खासदारांची संख्या ९७ झाली होती. मात्र, आज आणखी तीन खासदार निलंबित झाले आणि हा आकडा शंभरीवर पोहचला. दोन्ही सभागृहातील निलंबित खासदारांची संख्या आता १४६ वर पोहचली आहे. (MPs Suspended)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.