भारत-पाकिस्तान यांच्यात अखेर युध्दविरामा(Ceasefire)ची घोषणा झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही खूप चांगली गोष्ट आहे. शस्त्रसंधीबाबत आताच काही बोलता येणार नाही कारण यासंदर्भात संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा Ceasefire : भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा; पण… )
मुख्यमंत्री म्हणाले, मी प्रवासात होतो, त्यामुळे मला याबाबत संपूर्ण माहिती नाही. पूर्ण माहिती घेऊनच याबाबत भाष्य करेन, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाला अखेर पूर्णविराम मिळाला असून दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी(Ceasefire) लागू करण्यात आली. सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू केल्याची भारत सरकारने घोषणा केली
येत्या १२ मेला दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत दिली. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच भारतीय सैन्यदलांची पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.(Ceasefire)
Join Our WhatsApp Community