दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल अडचणीत; सीबीआयकडून समन्स

91

गेल्या काही महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत सापडले आहेत. मद्य विक्री धोरण घोटाळ्यातील चौकशीसाठी सीबीआयकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. त्यानंतर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून समन्स आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्विट करून सीबीआय आणि भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. ‘अत्याचाराचा अंत नक्कीच होणार’ अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1646846767781085184?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1646846767781085184%7Ctwgr%5E80cc497c42757555b204a68c52e0bb67fdbf8c31%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fcbi-summons-delhi-chief-minister-arvind-kejriwal-in-excise-policy-case-1167857

मद्य विक्री घोटाळ्याचा जन्म २०२० – २१ मध्ये झाला. दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्याचा फायदा मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. योग्य विभागाच्या परवानग्या न घेताच परवाना फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप तेव्हाच्या दिल्ल्ली सरकारवर आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देणारे निर्णय हे केवळ पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्या सरकारवर आहे. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह ३१ ठिकाणी छापे टाकले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – आशिष शेलार यांनी संजय राऊतांचा उल्लेख केला ‘सीरियल किलर’; नक्की काय म्हणाले?

याचा सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. त्याचसोबत सार्वजनिक मालमत्तेची कथित विटंबना केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी देखील अरविंद केजरीवाल यांना २७ एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.