Ajit Pawar यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

शरद पवार गटाकडून कोर्टात याचिका दाखल झाल्यास कोणताही आदेश देण्यापुर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

238
Ajit Pawar यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध शरद पवार गट (Sharad Pawar group) सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहे. मात्र यापूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) न्यायालयात पोहचले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी (०७ फेब्रुवारी) कॅव्हेट दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा गट न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहे. (Ajit Pawar)

शरद पवार (Sharad Pawar) न्यायालयात जाण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी न्यायालयाची धाव घेतली आहे. त्यांनी कॅव्हेट दाखल केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कुणाची? हा मुद्दा सुप्रीम कोर्टात सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे कालच स्पष्ट केले होते. (Ajit Pawar)

(हेही वाचा – UPI Outage : तुमचं युपीआय खातं तुम्हाला सध्या त्रास देतंय का?)

शरद पवार गटाकडून (Sharad Pawar group) कोर्टात याचिका दाखल झाल्यास कोणताही आदेश देण्यापुर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका करत अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सावध पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.