Cash for Query Case : महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केला

कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात खासदारकी गमावल्यानंतर टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी आपला सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांनी शुक्रवारी दिल्लीतील टेलिग्राफ लेन येथे असलेला बंगला क्रमांक ९ बी रिकामा केला. महुआंच्या वकिलांनी सांगितले की, बंगला रिकामा करण्यासाठी आज संपदा संचालनालयाचे अधिकारी आले होते.

174
Cash for Query Case : महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केला
Cash for Query Case : महुआ मोईत्रा यांनी बंगला रिकामा केला

कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात खासदारकी गमावल्यानंतर टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी आपला सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांनी शुक्रवारी दिल्लीतील टेलिग्राफ लेन येथे असलेला बंगला क्रमांक ९ बी रिकामा केला. महुआंच्या वकिलांनी सांगितले की, बंगला रिकामा करण्यासाठी आज संपदा संचालनालयाचे अधिकारी आले होते. मात्र, ते येण्यापूर्वीच सकाळी १० वाजेपर्यंत बंगला रिकामा करण्यात आला. (Cash for Query Case)

वकिलांनी सांगितले की, त्यांनी बंगल्याच्या चाव्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निष्कासनाची कोणतीही कारवाई झालेली नाही. संपदा संचालनालयाने १६ जानेवारी रोजी महुआंना बंगला त्वरित रिकामा करण्यास सांगितले होते. यापूर्वी संपदा संचालनालयाने महुआंना ७ आणि १२ जानेवारीला नोटीस पाठवली होती. कॅश फॉर क्‍वेरी प्रकरणात महुआंचे लोकसभा सदस्यत्व ८ डिसेंबर २०२३ रोजी रद्द करण्यात आले. (Cash for Query Case)

(हेही वाचा – Public Holiday : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर)

महुआंनी गुरुवारी (१८ जानेवारी) दिल्ली उच्च न्यायालयात डीओईंच्या नोटिसीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितले होते की त्या अविवाहित महिला असून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना बंगल्याच्या बाहेर करू नये. तथापि, उच्च न्यायालयाने डीओई नोटीसवर स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने महुआंची याचिका फेटाळून लावली आणि सांगितले की, त्यांना सरकारी बंगल्यात राहण्याचा अधिकार नाही, कारण त्यांची संसदेच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Cash for Query Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.