१७ एप्रिल २०२५ रोजी बांगलादेशातील त्यांच्या घरातून अपहरण झालेले हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांना मृतावस्थेत घराबाहेर फेकून देण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या चार दिवसांनंतर, आता Atikur Islam याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनाजपूर जिल्ह्यातील बासुदेवपूर गावातील ५८ वर्षीय भावेश चंद्र रॉय यांचे दुचाकीवरून आलेल्या लोकांनी त्यांच्या घरातून अपहरण केले. त्यांना नाराबारी गावात नेण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली. जेव्हा त्यांना परत पाठवण्यात आले तेव्हा ते बेशुद्ध होते. रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
(हेही वाचा Bombay High Court Aurangabad Bench बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा कडक बंदोबस्त)
सोशल मीडियावर लोक भावेशच्या मृत्यूसाठी इस्लामिक कट्टरपंथीयांना जबाबदार धरत आहेत. मुलगा स्वपन चंद्र राय यानेही तक्रारीत मुस्लिम तरुणांची नावे घेतली आहेत. या प्रकरणातील माहितीनुसार, अतिकुर इस्लाम Atikur Islam, मुन्ना इस्लाम, मुहम्मद रुबेल, रतन इस्लाम आणि इतर काही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी अब्दुस सबूर यांनी सांगितले की, आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community