भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय पर्यटक तुर्की (Turkish Airlines) आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकत आहेत. भारत सरकारने देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Turkish Airlines)
हेही वाचा-Exam : नीट-पीजी परीक्षा ‘या’ तारखेला एकाच सत्रात होणार; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
इंडिगोने २०२३ मध्ये तुर्की एअरलाइन्ससोबत एक वेट लीज करार केला होता. याअंतर्गत तुर्की एअरलाइन्सने इंडिगोला दोन बोईंग 777 विमाने, पायलट आणि काही क्रू मेंबर्स दिले होते. ही विमाने दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल दरम्यानच्या उड्डाणांसाठी वापरली जात आहेत. (Turkish Airlines)
हेही वाचा- वाळू चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग 777-300ER विमानांसाठी ‘वेट लीज करार’ फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली आहे, पण यावेळी अटी घातल्या आहेत. या कालावधीनंतर इंडिगो हा करार रद्द करेल आणि भविष्यात त्यासाठी आणखी मुदतवाढ मागणार नाही, ही अट घातली आहे. (Turkish Airlines)
हेही वाचा- Indian Army : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणात अचानक व्यत्यय येऊ नये म्हणून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कालावधी वाढवला. ही भाडेपट्टा ३१ मे रोजी संपत होती. ‘डंप लीज’ अंतर्गत, तुर्की एअरलाइन्स विमान, पायलट आणि देखभाल सुविधा पुरवत आहे, तर इतर क्रू मेंबर्स इंडिगोचे आहेत. DGCA ने दोन्ही विमानांच्या भाडेपट्ट्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांनी वाढवली आहे. विमान कंपनीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. (Turkish Airlines)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community