Pahalgam Terrorist Attack मधील दहशतवाद्यांच्या शरीरांवर कॅमेरे, एका खास अॅपचा वापर !

Pahalgam Terrorist Attack मधील दहशतवाद्यांच्या शरीरांवर कॅमेरे, एका खास अॅपचा वापर !

170
Pahalgam Terrorist Attack मधील दहशतवाद्यांच्या शरीरांवर कॅमेरे, एका खास अॅपचा वापर !
Pahalgam Terrorist Attack मधील दहशतवाद्यांच्या शरीरांवर कॅमेरे, एका खास अॅपचा वापर !

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या (Pahalgam Terrorist Attack) बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारलं. या घटनेनं देश हादरला असून, ‘दोषींना सोडणार नाही’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी दिला आहे. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा-Pahalgam Terrorist Attack नंतर 24 तासांत तिसरी चकमक ; उधमपूरमध्ये एक जवान हुतात्मा, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढले

या हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यापैकी चार ते पाच जण हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आले असण्याची शक्यता आहे. शिवाय हल्लेखोरांच्या शरीरांवर कॅमेरे लावण्यात आल्याची शंकाही जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बोलून दाखवली. या हल्ल्याबाबत सतत नवनवीन खुलासे होते आहेत. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एक खास मोबाइल ॲप होतं, ज्याचा वापर करून ते पहलगामच्या घनदाट जंगलातून बैसरन परिसरात पोहोचू शकले, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर …

दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता. याआधीही दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या ॲपचा वापर केला होता. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ॲप ट्रॅक करण्यात आलं आणि ते टाळण्यासाठी दहशतवाद्यांनी पहलगामच्या जंगलात त्याचा वापर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा

या हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपास संस्थांच्या मते, पाकिस्तानी लष्कराने त्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून ट्रॅकिंग टाळण्यासाठी मदत केली होती. हे मोबाइल ॲप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने विकसित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मोबाइल ॲप बनवल्यानंतर त्याच्या वापराबद्दल त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सनी दहशतवाद्यांना ते ॲप कसं वापरायचं, याचं प्रशिक्षण दिलं होतं. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.