Cabinet Meeting : इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन शासनातर्फे ईव्ही म्हणजेच ईलेक्ट्रिकल व्हेईकल्सला (EV) प्राधान्य दिले जात आहेत. नागरिकांनी, ग्राहकांनी अधिकाधिक ईव्ही खरेदी करावी यासाठी ईलेक्ट्रीक वाहनांवर सबशिडीही देण्यात येत आहे. त्यातच, आता मंत्रीमंडळात EV गाड्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी २९ एप्रिलला बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Cabinet Meeting)
(हेही वाचा – Arrest of Judge in America : विस्कॉन्सिन न्यायाधीशाला एफबीआयने केली अटक ; जाणून घ्या काय आहे आरोप …)
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीला मंजुरी दिली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणांतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना काही रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – Cabinet Decision : मंत्री मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर)
“राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी केलेली आहे. त्यामध्ये प्रवासी इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना विशिष्ट रस्त्यांवर टोलमाफी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलची निर्मिती आणि वापर वाढला पाहिजे आणि त्यासह चार्जिंगची व्यवस्था तयार झाली पाहिजे. त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी मंत्रिमंडळाने मान्य केली आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही पहा –