By-elections : चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर !

64
By-elections : चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर !
By-elections : चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर !

भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका (By-elections) घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत. (By-elections)

हेही वाचा-Kedarnath Dham Yatra 2025 : केदारनाथ यात्रेत तैनात असलेल्या पीआरडी जवानांना मिळाला २० लाखांचा विमा आणि अन्य सुविधा

गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती) : कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांचे निधन, (२) विसावदर : भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांचे राजीनामा; केरळ : (३) निलांबूर : पी. व्ही. अनवर यांचा राजीनामा; पंजाब : (४) लुधियाना वेस्ट : गुरप्रीत बसी गोगी यांचे निधन आणि पश्चिम बंगाल : (५) कालिगंज : नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे. (By-elections)

निवडणुकीचे वेळापत्रक
अधिसूचना जारी होण्याची तारीख २६ मे २०२५, नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५, नामनिर्देशन छाननी ३ जून २०२५ उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५, मतदान १९ जून २०२५ आणि मतमोजणी २३ जून २०२५ रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे. (By-elections)

हेही वाचा- PBKS Vs DC : दिल्लीने पंजाबचा 6 गडी राखून केला पराभव ; समीर रिझवीचं वादळी अर्धशतक

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. (By-elections)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.