लटके जिंकतील, पण सर्वाधिक मते शिवसेनेच्या पारड्यात पडतील का?

128

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून याचा निकाल येत्या रविवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान झाले असले तरी या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार असलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांना किती मतदान होईल याबाबत खुद्द शिवसैनिकच साशंक आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने शिवसैनिकांना आपल्या पक्षाच्या उमेदवार निवडून येणार असे वाटत असले तरी तरी अपेक्षित मते उमेदवाराच्या पारड्यात पाडून घेण्यात येणार नसल्याची भीती वाटून येत आहे.

( हेही वाचा : परिवहन मंत्र्यांऐवजी अध्यक्ष सांभाळणार ‘एसटी’ महामंडळाचा कारभार?)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्यासह अन्य सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून गुरुवारी झालेल्या निवडणुकीत ३१.७४ टक्के एवढे मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत भाजपने आपल्या मतदारांना नोटा मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाने सोशल मिडियाद्वारे केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आधीच मतदानाचा टक्का कमी झाल्याने त्यातच नोटाची मते वाढल्यास आपल्या उमेदवाराच्या पारड्यात किती मतदान पडेल याच्याच चिंतेत शिवसैनिक दिसून येत आहे. शिवसेनेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत लटके यांचा विजय निश्चित असला तरी सर्वाधिक मतांनी त्या निवडून याव्यात ही इच्छा आहे. त्यामुळे ही जास्त मते पक्षाला भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरणारी असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या निवडणक इतिहासात प्रथमच राबवण्यात आलेल्या घरुन मतदान या पर्यायास ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांनी मतदान केले आहे, घरुन मतदान या अंतर्गत ज्या ४३० ज्येष्ठ मतदारांची नाव नोंदवली होती, त्यापैंकी ३९२ मतदारांनी घरुन मतदान केले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाल्यास याचा परिणाम होणार नसून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील तो उमेदवार विजयी ठरला जाईल. मात्र, उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाल्यास मुंबईतील ही पहिली घटना ठरणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.