Maharashtra : पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ब्रिजेश दीक्षित

90

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी निवृत्त अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्य शासनामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य (Maharashtra) पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना मे २०२३ रोजी करण्यात आली. या महामंडळाच्या अंतर्गत तालुका- तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण, बळकटीकरण तसेच राज्यातील अन्य महत्वाच्या रस्त्यांची, पुलांची, इमारतींची दुरूस्ती, बांधणी ही कामे होणार आहेत. याशिवाय सार्वजनिक खाजगी भागीदारी(पीपीपी)तून हे महामंडळ राज्याबाहेरही कामे करणार आहे. तसेच ठेकेदार म्हणून देशभरातील पायाभूत सुविधा कामांची कंत्राटे घेण्याचे कामही महामंडळ करणार आहे.

ब्रिजेश दीक्षित यांना मेट्रो रेल नागपूर, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, रेल्वे तसेच रस्ते महामार्ग, पूल, व्हायाडक्टस आणि भुयार मार्ग बांधणी आदी पायाभूत विकास प्रकल्पांच्या कामांचा अनुभव आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त असून, मॉडर्न मेट्रो मॅन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार २०२२ सह अन्य महत्त्वपूर्ण पुरस्काराने दीक्षित यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

(हेही वाचा Khalistani : कॅनडात खलिस्तान्यांकडून गुजराती भाषिकांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.