BMC Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे पैसे राऊतांच्या मुलीच्या खात्यात; किरीट सोमय्या यांचा आरोप

BMC Khichdi Scam : सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी 132 कोटी रुपयांचा खिचडी कॉन्ट्रॅक्ट्स दिले होते, नंतर पेमेंटदेखील केले. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांच्या बेनामी कंपनींकडून सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले.

158
BMC Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे पैसे राऊतांच्या मुलीच्या खात्यात; किरीट सोमय्या यांचा आरोप
BMC Khichdi Scam : खिचडी घोटाळ्याचे पैसे राऊतांच्या मुलीच्या खात्यात; किरीट सोमय्या यांचा आरोप

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि उबाठा गटाचे नेते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना १७ जानेवारी रोजी खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. (BMC Khichdi Scam) या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली राम मंदिरावर आधारित टपाल तिकिटे)

विधिता राऊत यांच्या खात्यात गेले लाखो-करोडो रुपये

सोमय्या यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. ”संजय राऊतांची (Sanjay Raut) मुलगी विधिता राऊत (Vidhita Raut), भाऊ संदीप राऊत (Sandeep Raut) आणि सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्यातील लाखो-करोडो रुपये गेले आहेत. या सर्वांची चौकशी करण्यात यायला हवी”, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटी रुपये गेले

सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी 132 कोटी रुपयांचा खिचडी कॉन्ट्रॅक्ट्स दिले होते, नंतर पेमेंटदेखील केले. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांच्या बेनामी कंपनींकडून सुरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रुपये गेले. अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात देखील कोट्यवधी रुपये गेले आहेत. रवींद्र वायकर प्रकरणी हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने (BMC) परवानगी दिली. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी परवानगी दिली, ही परवानगी कशी दिली, त्याबाबत ईडीने विचारणा करायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Sion Traffic Changes : सायनमध्ये वाहतुकीमध्ये मोठे बदल, कुठे नो पार्किंग; कधीपासून बंद?)

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर

सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. सूडाच्या भावनेतून अटक झाली असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.

सोमय्या म्हणाले की, ”संजय राऊत (Sanjay Raut) हे उलटा चोर कोतवालला बोलत आहेत. तुमच्याकडे जे पैसे आलेत, त्याचा हिशोब द्या. पत्राचाळ प्रकरणी तुमच्या बायकोच्या खात्यात पैसे आले होते. त्याचा हिशोब द्या. नाहीतर जेलमध्ये जावे लागेल. घोटाळा केला नसेल, तर तुम्ही तक्रार करा. तुम्ही पाप केले, त्याचा हिशोब तर द्यावा लागेल.” (BMC Khichdi Scam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.