Bakra Eid च्या दिवशी West Bengal मध्ये वाहिले रक्ताचे पाट; बांगलादेशासोबत होत आहे तुलना

पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणच्या रहिवासी भागातील रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहत असतानाचे व्हिडिओ दिसत आहेत.

83

Bakra Eid च्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुसलमानांना दिलेले मोकळे रान पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिले आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रस्तोरस्ती प्राण्यांच्या कुर्बानी देण्यात आल्या. परिणामी इथे रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहताना दिसत आहेत. डॉ. सुकांता मजुमदार यांनी याचा एक व्हिडिओ X वर पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये पश्चिम बंगाल (West Bengal) आणि बांगलादेश या दोन्ही कडील व्हिडीओ टाकण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणच्या रहिवासी भागातील रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहत असतानाचे दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कोलकता महापालिकेकडून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून रक्तमिश्रित लाल पाणी येत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवर डॉ. मजुमदार यांनी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला (West Bengal) बांगलादेशामध्ये रूपांतरित करत आहेत, असे म्हटले आहे.

(हेही वाचा पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट Vinay Narwal यांच्या पत्नीचा धर्मांध मुसलमान मोहिबुल हक आणि गुलाम जिलानीने AI द्वारे केला अश्लील व्हिडीओ)

डॉ. मजुमदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः तुष्टीकरणाद्वारे सत्तेवर टिकून राहण्यासाठी पश्चिम बंगालला ‘ग्रेटर बांगलादेश’ बनवण्यास उत्सुक असतात, तेव्हा त्याचे परिणाम खूपच भयानक असतात. काल एका विशिष्ट धार्मिक उत्सवानंतर कोलकातामधून समोर आलेले चित्र बांगलादेशमध्ये दिसणाऱ्या चित्रांपेक्षा वेगळे नाही! रस्ते लाल झाले आहेत आणि महापालिकेच्या नळांमधून वाहणारे पाणी देखील रक्ताने मिसळलेले असल्याचे वृत्त आहे! पश्चिम बंगालला (West Bengal) हळूहळू बंगाली हिंदूंसाठी कत्तलखाना बनवण्यासाठी आता उच्च पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तुष्टीकरणाने ग्रस्त ‘हिरक राणी’ दुसरे बांगलादेश निर्माण करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही थांबवणार नाही – कोणत्याही किंमतीवर!, असे डॉ. सुकांता मजुमदार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.