Blast in Lahore : पाकड्यांची तंतरली ! लाहोर विमातनळाजवळ सलग तीन स्फोट ; पाकिस्तानी सैन्याने केली मोठी चूक

Blast in Lahore : पाकड्यांची तंतरली ! लाहोर विमातनळाजवळ सलग तीन स्फोट ; पाकिस्तानी सैन्याने केली मोठी चूक

208

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या तंबूत चांगलीच घबरटाट पसरली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे हादरलेल्या पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना घडली. लाहोरमध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Blast in Lahore)

घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरात एकामागून एक असे तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटांच्या आवाजाने लाहोरमध्ये एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. स्फोटाचे आवाज ऐकू येताच नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन पळापळ केल्याचे दिसून आले. लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरील वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. तर लाहोर विमानतळ बंद करण्यात आला आहे. (Blast in Lahore)

मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सरावादरम्यान विमानतळाजवळ हा स्फोट झाला. पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे आणि परिसरात सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक जिओ न्यूजने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान अद्याप कळलेले नाही. पण छायाचित्रांवरून असे दिसून येते की इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर लाहोर विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले आहे. (Blast in Lahore)

पाकिस्तानी सैन्याने केली मोठी चूक !
लाहोरमधील स्फोटाबाबत पाकिस्तानी लष्कराच्या सूत्रांकडून मोठी बातमी येत आहे. लाहोरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सरावादरम्यान विमानतळाजवळ स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा की पाकिस्तानी सैन्याने चुकून स्वतःच्या शहरावर हल्ला केला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.