BLA IED Blast : पाकला दुसरा मोठा दणका ! BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवली ; 12 सैनिक ठार

BLA IED Blast : पाकला दुसरा मोठा दणका ! BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवली ; 12 सैनिक ठार

174
BLA IED Blast : पाकला दुसरा मोठा दणका ! BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवली ; 12 सैनिक ठार
BLA IED Blast : पाकला दुसरा मोठा दणका ! BLA ने पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवली ; 12 सैनिक ठार

भारताने 7 मे रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन धडा शिकवला याला २४ तास उलटले नाही तोवर दुसऱ्याबाजूला बलोच बंडखोरांनी पाकिस्तानाला दुसरा मोठा दणका दिला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA IED Blast) पाकिस्तानी सैन्याची गाडी IED स्फोटात उडवून दिली. यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले आहेत. (BLA IED Blast)

बलूच लिबरेशन आर्मीच्या (Baloch Liberation Army) स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वाडने (STOS) बोलनच्या माच कुंड क्षेत्रात रिमोट कंट्रोलद्वारे IED चा मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटात पाकिस्तानी सैन्याच्या गाडीला टार्गेट करण्यात आलं. यात त्यांच्या 12 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हे सैनिक मिलिट्री ऑपरेशनसाठी चालले असताना हा हल्ला झाला. (BLA IED Blast)

पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम प्रांतात बलूचिस्तानच्या कच्छी जिल्ह्याच्या माच क्षेत्रात सैन्याच्या एक वाहनावर घात लावून IED द्वारे हल्ला करण्यात आला. हा हल्ला मंगळवारी झाला. पण हल्ल्याच फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. स्फोटानंतर गाडीतील सैनिक हवेत अक्षरक्ष: उडाले. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झाले. (BLA IED Blast)

मागच्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने बलूचिस्तान प्रांतात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले सुरु आहेत. यात त्यांना मोठ नुकसान होतय. मार्च महिन्यात क्वेटावरुन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसच बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी अपहरण केलं होतं. यात 440 प्रवासी होते. यात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले गेले. बलूचिस्तान दीर्घकाळापासून अशांत आहे. मागच्या दोन दशकापासून पाकिस्तानच्या या प्रांतात अस्थिरता आहे. आता तर पाकिस्तानी सैन्यावर बलूचिस्तानात हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (BLA IED Blast)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.