BJP : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जानेवारीमध्ये

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. लोकसभेतील काही खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे तर राज्यसभेतील काही खासदारांना निवणुकीच्या मैदानात उतरविले जाणार आहे.

185
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन

लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप चार महिन्याचा उशीर असला तरी भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी-शेवटी काही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे. (BJP)

भाजपातील (BJP) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. लोकसभेतील (Lok Sabha) काही खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे तर राज्यसभेतील काही खासदारांना निवणुकीच्या मैदानात उतरविले जाणार आहे. अशात, जेवढ्या लवकर उमेदवाराची निवड होईल तेवढेच चांगले होईल, असे पक्षाला वाटत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. (BJP)

(हेही वाचा – Bharat Brand : केंद्र सरकार २५ रुपये किलो दराने विकणार तांदूळ)

भाजपच्या मुख्यालयात (BJP HQ) राज्यातील नेत्यांसोबतच बैठकांचे मॅराथॉन सत्र सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकाचा कार्यक्रम घोषित करण्यापूर्वी भाजपकडून उमदेवारांची यादी जाहीर करण्याची तयारी केली जात आहे. सर्व काही सुरळीत झाले तर जानेवारीमध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. (BJP)

विशेषत: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील अध्यक्षांनी राज्यातील परिस्थिती विषद केली आहे. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) नुकतीच संपली आहे आणि भाजपची (BJP) सत्ता आली आहे. तिन्ही राज्यांत वातावरण चांगले आहे. अशात, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली तर विधानसभेपेक्षाही (Assembly) चांगले निकाल येऊ शकतात, असे मत राज्यांच्या अध्यक्षांनी हायकमांपुढे मांडले असल्याचे समजते. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.