भारत सरकारच्या सात संसद सदस्य शिष्टमंडळात काँग्रेसचे Shashi Tharoor नेतृत्व करणार आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती जगापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने संसद सदस्याचे शिष्टमंडळ विदेशात पाठविणार आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. त्यात अधिक चर्चा रंगली ती काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नावाची. महत्त्वाचे म्हणजे संसद सदस्य तुम्ही निवडू नका आम्हाला निवडू द्या, असे केंद्र सरकारला विरोधकांनी म्हटले. काँग्रेस खासदार शशी थरुर(Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ विदेशात ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार आहे.
(हेही वाचा ‘Operation Sindoor’वर भारताची भूमिका मांडणार ‘हे’ सात खासदार; विदेशात कोण-कोण शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार )
दरम्यान, खासदार शशी थरुर(Shashi Tharoor)यांचा उल्लेख करत भाजपने काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधी भारतासाठी बोलणाऱ्यांचा द्वेष का करतात?’, अशी विचारणा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी काँग्रेसकडून नावे मागितली होती. पण, काँग्रेसने पाठविलेल्या यादीत शशी थरुर यांचे नाव नव्हते. त्यामुळे आता शशी थरूर(Shashi Tharoor) यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली.
काँग्रेसवर टीका करताना भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश हे त्यांचेच काँग्रेस सदस्य शशी थरूर यांना संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यास विरोध करतात. राहुल गांधी भारतासाठी बोलणाऱ्या प्रत्येकाचा, अगदी त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा द्वेष का करतात?, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
Yesterday morning, the Minister of Parliamentary Affairs Kiren Rijiju spoke with the Congress President and the Leader of the Opposition in the Lok Sabha. The INC was asked to submit names of 4 MPs for the delegations to be sent abroad to explain India’s stance on terrorism from…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 17, 2025
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित शिष्टमंडळांसाठी काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील काँग्रेस उपनेते गौरव गोगोई, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि लोकसभा खासदार राजा ब्रार यांची निवड केली, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितल्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेस खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारला
काँग्रेस खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांनीही सरकारची ऑफर स्वीकारत म्हटले की, जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या सेवांची आवश्यकता असते, तेव्हा मी मागे राहणार नाही. अलीकडील घटनांबद्दल आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी पाच प्रमुख देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारच्या आमंत्रणाचा मला सन्मान वाटतो. जय हिंद,” असे शशी थरूर यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे म्हटले. (Shashi Tharoor)
Join Our WhatsApp Community