BJP ची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी; 56 जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्य निवडणूक आयोग व सरकारला पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिलेत.

49

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने (BJP) मंगळवारी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांसाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यात स्थानिक पातळीवरील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या हाती जिल्ह्याच्या राजकारणाची चावी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिस स्वराज्य संस्थांची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्य निवडणूक आयोग व सरकारला पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिलेत. ही निवडणूक 2022 च्या राजकीय आरक्षणासह होणार आहे. त्यानुसार, सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. भाजपने मुंबईसाठी उत्तर, उत्तर पूर्व व उत्तम मध्य अशा 3 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या तिन्ही विभागांची जबाबदारी अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी व विरेंद्र म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

(हेही वाचा आदमापूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा पाकड्यांचा दावाही PM Narendra Modi यांनी ठरवला फोल)

याशिवाय नांदेड महानगरची जबाबदारी अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याच्या शहराच्या जिल्हाध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, भिवंडीच्या रविकांत सावंत, साताऱ्याच्य जिल्हाध्यक्षपदी प्रकाश ढंग, सांगली ग्रामीणसाठी सम्राट महाडिक, हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन घुगे, नंदुरबारसाठी निलेश माळी, अहिल्यानगर उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करम्यात आली आहे.

याशिवाय बुलढाणाच्या जिल्हाध्यक्षपदी विजयराज शिंदे, खामगाव सचिन देशमुख, अकोला महानगर जयवंतराव मसणे, वाशिम पुरुषोत्तम चितलांगे, यवतमाळ प्रफुल्ल चव्हाण, नागपूर महानगर दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण (रामटेक) अनंतराव राऊत व नागपूर ग्रामीण (काटोल) मनोहर कुंभारे यांची नियुक्ती केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.