भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असताना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी न्यायालयीन कारवायांबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा जुना व्हिडिओ भाजपाने सोमवारी पोस्ट केला. तसेच भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी, काँग्रेसला स्वतःचा भूतकाळ माहित असला पाहिजे, असे सांगत काँग्रेसला सुनावले आहे.
काय म्हणालेल्या इंदिरा गांधी?
या व्हिडिओमध्ये इंदिरा गांधी (Indira Gandhi) या आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या अतिरेकी निर्णयांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शाह आयोगाच्या स्थापनेवरून टीका केली होती. राजकीय जगात काय चालले आहे हे शाहांना कसे कळते? विकसनशील अर्थव्यवस्था नष्ट करू इच्छिणाऱ्या कोणत्या शक्ती कार्यरत आहेत? न्यायाधीश हे ठरवण्यास सक्षम आहेत का? मग लोकशाही का आहे? निवडणुका का आहेत? राजकीय लोक सत्तेत का आहेत?, अशी प्रश्नांची सरबत्ती करताना इंदिरा गांधी (Indira Gandhi) या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
(हेही वाचा Muslim : कर्नाटकात ३० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या ३९ लाखांवरून ७७ लाख वाढली; हिंदूंची संख्या किती वाढली?)
न्यायमूर्ती शाह आयोगाची स्थापना जनता पक्षाने केली होती. आणीबाणीनंतर इंदिरा सरकार कोसळले, त्यानंतर जनता पक्षाच्या सरकारने आणीबाणीच्या काळात इंदिरा सरकारने घेतलेल्या निर्णयाची चौकशी न्यायमूर्ती शाह यांच्या माध्यमातून सुरु केली होती. गांधींनी (Indira Gandhi) लादलेल्या आणीबाणीच्या काळात सत्तेचा गैरवापर आणि कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते. आणीबाणीच्या २१ महिन्यांत इंदिरा गांधींनी राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य कसे कथितपणे रद्द केले होते हे शाह आयोगाच्या अहवालात उघड झाले आहे.
भाजपाने काय दिले उत्तर?
सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या सरन्यायाधीशांवर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी टीकाटिप्पणी केली. त्यामुळे काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले. म्हणून भाजपाने न्यायव्यवस्थेवर टीका करतानाचा इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा व्हिडीओ पोस्ट केला. संसदेत वक्फ सुधारणा विधेयक संमत झाल्यावर त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी समयमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय दिला. तसेच वक्फ कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली. त्या पार्श्वभूमीवर खासदार निशिकांत दुबे यांनी जर सर्वोच्च न्यायालय कायदे करणार असेल तर संसद बंद करावी, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. तर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना लक्ष्य करत झारखंडच्या खासदाराने त्यांना “देशातील सर्व गृहयुद्धांसाठी” जबाबदार म्हटले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले.
Join Our WhatsApp Community