
Nitesh Rane : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी २२ एप्रिलला दहशदवादी हल्ला झाला. यावेळी निष्पाप २६ जणांना बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे भारतातील वातावरण तनावग्रस्त झाले आहे. अशातच काँग्रेसच्या (Congress) एक बड्या नेत्यांनी घटनेवर गरळ ओकली आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार यांची मानसिकता तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्याची गरज आहे. यावर पलटवार करत भाजपाचे मंत्री तथा आमदार नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असा आरोप केला आहे. (Nitesh Rane)
(हेही वाचा – पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकसापोटी कारवाई; विहिंप Police आयुक्तालयावर काढणार मोर्चा)
विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पहलगाम हल्ल्यावरून एक वादग्रस्त विधान केले होते. ‘पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांना ठार मारले असा दावा केला जात आहे. पण असे विचारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो का? दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे विविध प्रश्न त्यांनी याविीषयी उपस्थित केले होते.
काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या या विधानावर संताप व्यक्त करताना त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्याची मागणी केली. काँग्रेसने काही वर्षांपूर्वी भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता. त्यामुळे वडेट्टीवार दहशतवादाला रंग नाही असे विधान कसे काय करू शकतात? त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची विधाने ऐकावी. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – Elphinstone Bridge परिसरातील १९ इमारतींच्या रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित घरे; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय)
मुख्यमंत्र्यांचीही वडेट्टीवारांवर टीका
“वडेट्टीवारांचे विधान हे असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करु शकणार नाही. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community