देशात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका; भाजपचा काय आहे प्लॅन?

153

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत, त्या एक प्रकारे लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट असणार आहे, त्यामुळे भाजप या राज्यांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या देशातील तीन राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपने रणनीती ठरवली आहे. त्यानुसार भाजपची वाटचाल सुरु राहणार आहे.

नागालँडमध्ये युती 

ईशान्य भारतातील तीन राज्ये मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपला स्थानिक पक्षांची गरज लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकांसाठी युती-आघाडीचा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार भाजप नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सोबत युती करणार आहे. त्यावर आता भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांकडून शिक्कामोर्तब झाले आहे. इथे एकूण ६० जागांपैकी भाजप 20 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या राज्यात गालँडच्या उर्वरित 40 जागांवर एनडीपीपी, जे एनईडीएचा घटक म्हणजेच नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सच्या उमेदवारांना तिकीट मिळेल.

(हेही वाचा मोदी बाळासाहेबांसमोर नतमस्तक व्हायचेच! लहानांनी मोठ्यांना मान देण्यात कसला आलाय कमीपणा?)

मेघालयात स्वबळावर 

मेघालयामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. येथील एनईडीएच्या घटक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने आधीच युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

त्रिपुरात युती करणार

त्रिपुरामध्ये नवीन पार्टी टिप्रा मोथासोबत युती करण्याची भाजपची चर्चा सुरू आहे. पण टिप्रा मोथाचे नेते प्रद्युत देबबर्मा म्हणाले की, जर भाजप किंवा कोणत्याही राष्ट्रीय पार्टीने त्यांना टिप्रा मोथा लँडचे लेखी आश्वासन दिले तर ते त्या पार्टीशी युती करण्यास तयार आहेत. विशेष म्हणजे या मुद्द्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि प्रद्युत देबबर्मा यांच्यात दिल्लीत बैठकही झाली आहे. टिप्रा मोथा यांना आधीच सीपीएमकडून युतीचा प्रस्ताव आला आहे, परंतु पक्षाचे नेते प्रद्युत देबबर्मा यांनी सीपीएमचा प्रस्ताव नाकारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.