सत्तेबाबत अपेक्षाभंग झाल्याने भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर

96

दोन राज्यांत सध्या केंद्राच्या एजन्सीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. महाराष्ट्र आणि प. बंगाल ही दोन राज्ये भाजपाला हवी होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला, म्हणून ते ही दोन राज्ये ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार हे जळगावात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

मी जातीयवादी नाहीच

माझ्या नावावर जातीयवादाचा आरोप केला जात आहे. तो आरोप का केला जात आहे, मला माहीत नाही. एनसीपीची स्थापना झाली तेव्हापासून अध्यक्षपदाची नेते पहा ते सगळ्या जातीचे होते, असेही पवार म्हणाले. समंजस्याने प्रश्न सोडवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येते का, अशी चिंता आहे. सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाच्या मार्गावर जायचे ठरवले, असेही शरद पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, फडणवीसांनी मला जातीयवादी का म्हटले हे मला माहिती नाही. फडणवीसांनी केलेल्या ट्वीटचा मी आनंद घेतोय. त्यांच्याकडे दुसरे काही बोलण्यासारखे नाही, त्यामुळे ते तसे बोलत आहेत. १५ वर्षांत अखंड भारत होईल असे म्हटले आहे, १५ वर्षांचा काळ मोठा नाही, लवकरच समजेल, असे मत सरसंघचालकांच्या वक्तव्यावर मांडले.

(हेही वाचा दोघा-चौघांना आधीच आत टाकलं असतं तर…, खडसेंकडून गृहमंत्र्यांची कानउघडणी)

बाबासाहेब पुरंदरेंवर टीका

मनसेने सादर केलेल्या पुस्तकाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जेम्स लेन या लेखकाने शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीही लिहिले आहे. त्याने शिवछत्रपती आणि जिजामाता यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिला आहे. अत्यंत गलिच्छ इतिहास लिहिला गेलाय. पण ते जेम्स लेन हा चांगला इतिहास अभ्यासक असल्याचे पुरंदरेंनी म्हटले,  त्यांच्याबद्दलची लोकांनी भूमिका या आधीच स्पष्ट केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.