‘…दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही’; पूनम महाजनांंचं राहुल गांधींवर टीकास्त्र

110

विलेपार्ले विधानसभेत भाजपाकडून जागर मुंबईचा या अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी आमदार, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी आणि भाजपच्या नेत्या, खासदार पूनम महाजन उपस्थित होते. यावेळी पूनम महाजन यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला. यासभेदरम्यान पूनम महाजन म्हणाल्या, दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही, राहुल गांधी लोकांना भ्रमित करत आहेत.

(हेही वाचा – राज्यपालांकडून भूमिका स्पष्ट, अमित शाहांना पत्र; म्हणाले, ‘…स्वप्नातही कल्पना करू शकत नाही’)

काय म्हणाल्या पूनम महाजन

तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा बघायची गरज नाही. इथेच राहुल गांधींचा उलटा दिमाग पाहता येईल. आता निवडणुका आल्या की त्यांना राम आठवतो… जिन को राम याद आता है.. वो विदेश मे आराम करता है… त्यांना फक्त हाच राम माहिती आहे. राहुल गांधींनी नेहमीच मातेच्या मागे उभे राहून राजकारण केले. यापूर्वी सोनिया गांधींच्या मागे उभे राहून राजकारण केले आणि आता सीतामातेचा वापर करणे सुरू आहे, कुठे आहे तुमचा पुरूषार्थ, असा सवाल देखील पूनम महाजन यांनी उपस्थित केला आहे.

पुढे त्या असेही म्हणाल्या की, दाढी वाढवल्यामुळे कोणी नरेंद्र मोदी होत नाही. त्यासाठी समर्पण आणि ताकद कमवावी लागते. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून भारत भ्रमण करत आहेत की लोकांना भ्रमित करत आहेत. स्वसमृध्दीसाठी राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. ही तीच काँग्रेसची सत्ता आहे, २००७ मध्ये जेव्हा एएसआयने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात रामसेतू हा ऐतिहासिक आहे, असा अहवाल दिला होता. त्याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या सत्तेने युपीएने तो अहवाल परत घेतला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.