देवेंद्र फडणवीसांना कोरोना; ट्विटवर आवाहन करत म्हणाले, सर्वांनी काळजी घ्या!

126

राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, राहूल गांधींसह प्रियांका गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना ताप आणि कणकण होती. शनिवारी त्यांना ताप आल्याने अकोल्यातील दौरा अर्धवट सोडला. यासह पूर्वनियोजित सोलापूरचा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.

(हेही वाचा – चित्रा वाघ म्हणाल्या, “अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा …”)

…त्यामुळे अन्य नेत्यांनाही करावी लागणार चाचणी 

यादरम्यान, फडणवीसांनी स्वॅब टेस्टिंगसाठी दिले होते. यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. चिंताजनक म्हणजे दोन दिवसांपूर्वी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी भेटले होते. यामध्ये छगन भुजबळ आणि सुनील केदार यांचाही समावेश होता. फडणवीसांना कोरोनाची लक्षणं असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली आहे. मात्र, यामुळे आता अन्य नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीसांनी केले आवाहन

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून होम आयसोलेशनमध्ये ते आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासह त्यांनी आवाहन करत माझ्या संपर्कात आलेल्यांना कोविड चाचण्या करून घेण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.