‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

206
'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले...
'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मंगळवारी झळकलेल्या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असा उल्लेख असलेल्या जाहिरातीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीमध्ये एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती दर्शवल्याचे सांगितले आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे, तसेच राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या जाहिरातीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत या निष्कर्षाला काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय)

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, २०१४मध्ये आम्हाला १२४च्यावर जागा मिळाल्या होत्या. २०१९मध्ये भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आता आपले सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. दोघेही चांगली काम करत आहेत. यंदा देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प लोकप्रिय होता, त्यामुळे या सरकारची कामगिरी त्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस मागे आणि एकनाथ शिंदे पुढे गेले जो काही निष्कर्ष लावला आहे, त्या निष्कर्षाला काही अर्थ नाही. शिवसेना आणि भाजप भाऊ म्हणून काम करत असून एकनाथ शिंदेंच्या मनात कधीच देवेंद्रजींपेक्षा जास्त पसंती आहे, असे येत नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त पसंती आहे, असं वाटत नाही. दोघेंही चांगले बॅट्समन आहेत. जोरात काम करत आहे. जनतेला काय पाहिजे हे महत्त्वाचे आहे. कोण पुढे आणि कोण मागे हे महत्त्वाचे नाही. शेवटी हा जनतेचा निर्णय असतो, जनता पसंती ठरवते. २०२४च्या निवडणुकीमध्ये शेवटी काय पसंती मिळते, याला जास्त अर्थ असतो. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन सरकारकडून अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्राची जनता, मोदीजी, देवेंद्रजी, एकनाथजींकडून अपेक्षा ठेवून आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.